करमाळा (विशाल परदेशी) :
करमाळा पंचायत समितीचे १२ गणातील संभाव्य उमेदवार
आपली मैत्री जगजाहीर व्हावी या हेतूने 20 जुलै 1958 ला डॉ. आर्टीमिओ ब्रेको यांनी ‘वर्ड फ्रेंडशिप डे’ (World Friends Day) साजरा करण्याची कल्पना मांडली. याचा व्यावसायिक फायदा घेण्याच्या दृष्टीने पराग्वे येथील ग्रीटिंग बनवणाऱ्या एका कंपनीने हा दिवस प्रमोट करण्याच्या हेतूने ग्रीटिंग्ज बनवून ते बाजारात आणले. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा प्रघात पडला.

आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या अनुकरणापेक्षा पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण लगेचच होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा संकेत आहे. परंतु करमाळा शहरातील स्टेशनरी दुकानांत गुरुवार (ता.28) पासूनच ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याच्या निमित्ताने लागणारे फ्रेंडशिप बँड, फ्रेंडशिप कार्ड, फ्रेंडशिप रिंग्स ची मागणी होऊ लागल्याने या वस्तू विक्री करणारे दुकानदार ही संभ्रमात पडले आहेत.

भारतीय संस्कृतीत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना शुक्रवारी (ता. 29 ) ला सुरू झाला आहे आणि सोमवार ( ता.1 ) रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. त्यामुळे षोडशवयीन विद्यार्थ्यांच्या मनात फ्रेंडशिप डे संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. श्रावणाच्या पहिल्या रविवारलाच ‘फ्रेंडशिप डे’ आहे, असे समजून त्यांनी गुरुवारपासूनच स्टेशनरी दुकानांत शालेय साहित्या सोबतच ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी करण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात मेन रोडवरील ‘शुभम जनरल स्टोअर्स’चे दुर्गेश राठोड यांनी सांगितले की, दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. त्यामुळे आम्ही त्याआधी दोन-तीन दिवसांपूर्वी फ्रेंडशिप डे साठी लागणाऱ्या वस्तू विक्रीला ठेवतो. परंतु यावर्षी गुरूवार (ता. 28) पासूनच फ्रेंडशिप बँड, फ्रेंडशिप रिंग आणि तत्सम वस्तूंची मागणी होऊ लागल्याने आम्ही संभ्रमात पडलो.

त्यामुळे आम्ही तातडीने अशा वस्तू मागवल्या. एकूणच श्रावण महिना व ऑगस्ट महीना लागोपाठ सुरू होत असल्याने नवतरुणांचा गोंधळ झाला आणि गैरसमजुतीमुळे रविवारी (ता. 31 जुलै) ला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याचा एक वेगळा पायंडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा; हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे आवाहन


