‘वायसीएम’मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी शाखेचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे उदघाटन झाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) उदघाटन झाले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी नगरसेवक अतुल फंड, राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड, किसान सेलचे सचिन नलवडे, कुमार माने, ऋषिकेश शिगची, आरशान पठाण यावेळी उपस्थित होते.

गव्हाणे यांनी शाखेचे उदघाटन करण्यापूर्वी करमाळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी कुमार माने यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेथे माने यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गव्हाणे यांनी दिले.

हलगीच्या कडकडात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर शाखेच्या फलकाचे उद्घटन झाले. यावेळी संयोजकांनी प्रमुख मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यानंतर महाविद्यलयात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर सवांद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *