करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन होणार आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता हे उदघाटन राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष राहुल कवडे, अरुणकाका जगताप, अतुल फंड, अभिषेक आव्हाड, शरद नेटके, काकासाहेब सरडे, सचिन नलवडे, लाला शिंगटे, रामभाऊ नलवडे, अमीर तांबोळी, कुमार माने हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ऋषिकेश शिगची व आरशान पठाण यांनी दिली आहे.