भिगवण : स्वामी चिंचोली (ता. दौंड, जि. पुणे) येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षासाठी (२०२४-२५) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॉलेजच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
प्रमुख पाहुणे म्हणून राधेश्याम पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिवा माया झोळ, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉ. विशाल बाबर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ज्ञानेश्वर गाढवे यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. प्रा. राम निखाते यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कलात्मक कौशल्य सादर केले. महाविद्यालयाच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी अनुभव लेखन करत ‘आपण कसे यश मिळवू शकतो? यावर शॉर्ट सेशन घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी जेडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.