करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दिलमेश्वर- वडाचीवाडी ग्रामपंचायत अंतर्गत वडाचीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या उषा गुटाळ यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे.

शाळेच्या संरक्षक भीतीचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. वाळूचा वापर करण्यात आला नाही. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करावी. या कामाची मुदत वाढ घेऊन काम करण्याची मागणी संबंधित अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य गुटाळ यांनी केली आहे.

