करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील कामोणे येथील आवळा शेतीला भेट दिली आहे. कामोणे येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काळे यांनी शेतात आवळा बाग केली आहे. या शेतीची पाहणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे. यावेळी करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, तानाजी झोळ, सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे उपस्थित होते. यावेळी काळे यांनी आवळा शेतीची माहिती दिली. आमदार शिंदे यांनी या भागात काळे यांनी केलेल्या शेतीतील वेगळ्या प्रयोगाचे कौतुक केले.


