करमाळा (सोलापूर) : लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने ‘आई आणि वडील’ अशा दोन्ही भूमिका पार पडत शिक्षण पूर्ण केले. अचानक वडील जग सोडून गेले. त्यानंतर आजोबांनी शिक्षणासाठी मदत केली. त्यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही. शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. त्यामुळेच शिक्षण पूर्ण करता आले आणि डॉक्टर होता आले. पुढे पती डॉ. रोहन प्रदीप पाटील यांनी मदत तर केलीच शिवाय सासरे डॉ. प्रदीपकुमार जाधव- पाटील यांनी जे प्रोत्साहन दिले त्यामुळेच रुग्णाचा विश्वास संपादन करून ही चार मजली वस्तू उभा राहिली. तोच वारसा आम्ही पुढे नेहत असल्याचे जाधव- पाटील हॉस्पिटल येथील जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबच्या प्रमुख डॉ. शिवानी पाटील यांनी सांगितले आहे.
डॉ. शिवानी पाटील यांचे एमबीबीएस, एमडी पॅथॉलॉजी शिक्षण झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आजोबांनी, आई व मावशी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे माहेर नांदेड आहे. दहावी व बारावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण लातूर येथे पूर्ण झाले. त्यानंतर कराड व पुणे येथे त्यांनी शिक्षण घेतले. करमाळा, जामखेड, कर्जत, परांडा यासह करमाळा तालुक्याच्या परिसरातील तालुक्यात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी म्हणून जाधव पाटील रुग्णालय प्रसिद्ध आहे.
सर्पदंशाशिवाय येथे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, विषबाधा, थायरॉड ग्रंथीचे आजार, फुफ्पुसाचे आजार, न्यूमोनिया, दमा, टीबी, मेंदूरोग (अर्धांगवायू, फिट येणे, मेंदूज्वर, डोकेदुखी) किडनीचे विकार, श्वसन विकार, पोटाचे विकार, आतड्याचे विकार, संधिवात व सांधेदुखी, डेंगू, टायफाईड, मलेरिया, कॉलरा व क्षयरोग यावर उपचार केले जातात.
‘अविरत सेवा हाच उद्देश’ असे ब्रीद वाक्य असलेल्या जाधव पाटील हॉस्पिटलमधील जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबच्या प्रमुख म्हणून डॉ. शिवानी पाटील या कार्यरत आहेत. कठीण काळातून शिक्षण घेतानाच त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले होते. त्यांच्यातील शिक्षणाची जिद्द पाहून त्यांना बळ देण्याचे काम माहेरच्या मंडळीने केले. पुढे डॉ. प्रदीपकुमार पाटील यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिले. सासरच्या मंडळीकडून प्रोत्साहन मिळाल्यानेच आम्ही या वटवृक्षाच्या छायेत आहोत. हा वटवृक्ष आणखी मोठा करण्याचे काम आम्ही त्यांच्याच प्रेरणेतून करत आहोत असे त्या म्हणत आहेत.

डॉ. शिवानी पाटील यांनी संवाद साधताना त्यांचा प्रवास उलगडला. यामध्ये प्रेरणा कशी मिळाली हेही सांगितले. हे सांगताना करमाळा सारख्या शहरात आम्हला रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली याचा आंनद आहे असे त्यांनी सांगितले आहे. जिजाऊ पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त, लघवी, थुंकी, ब्लड ग्रुप, सर्व स्पेशल टेस्ट (Thyroid, Vit.B१२,Vit.D, HbA१c) कोरोना संबंधित सर्व तपासण्या, प्रजनन चाचण्या- स्त्री व पुरुष, पॅप स्मियर- स्त्री, संधिवात तपासणी, गाठीची तपासणी, सर्व कॅन्सर संबंधित तपासण्या, २४ तास इमर्जन्सी सेवा व फ्रि होम कलेक्शन याच्या सुविधा आहेत.