राजुरीत लंपी आजाराने घेतला जर्सी गायींचा बळी; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

Farmers should be vigilant to control Lumpi Tehsildar Sameer Mane

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील राजुरी येथे लंपी आजारांमुळे एका जर्सी गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजुरी येथील निलचंद दुरंदे यांची दीड लाख किंमतीची जर्सी गायचा लंपी आजाराने मृत्यु झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा संबंधित शेतक-याने आरोप केला आहे.

Advertisement
Advertisement

याबाबत शेतकरी निलचंद दुरंदे यांनी पशुवैद्यकीय यंञेणवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना निलचंद दुरंदे म्हणाले, 11 सप्टेंबरपासुन जर्सी गाय आजारी होती. यानंतर डाॅक्टरांनी उपचार सुरू केले. आठ दिवस उपचार केल्यानंतरही फरक पडला नाही. त्यानंतर 18 तारखेला गाईच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मात्र गायीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर पाच दिवसांनी रिपोर्ट आला. यामध्ये गाईला लंम्पी आजाराची लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सोमवार (ता. 26) सकाळी गायींचा मृत्यू झाला आहे.

गाईला योग्यवेळी योग्य उपचार मिळण्यास उशीर झाल्यानेच गायीचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? यातून साधारणपणे एक ते दीड लाखाचे नुकसान यामुळे झाले आहे. लंम्पी आजारामुळे जनावरे दगावण्याच्या तालुक्यात हा पहिला प्रसंग आहे. राजुरी येथील निलचंद दुरंदे यांची जर्सी गायी दहा दिवसांपासून आजारी होती. गाईवर उपचार करण्यात येत होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने जर्सी गायींचा मृत्यू झाला आहे.

राजुरी गावात साधारण सहा जनावरे लिपीसदृश्य आजाराने आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजुरी येते लंम्पी आजाराने जर्सी गायींचा मृत्यू झाल्याचे समजताच शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सध्या लंम्पी आजारावर लसीकरण करण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत तालुक्यातील अनेक ठिकाणांहून लंम्पी आजाराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र  यामध्ये लंम्पी सदृश्य आजाराचे एकही जणांवर आढळून आले नव्हते.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात रविवार भाद्रपद पोळा साजरा करण्यात आला. पोळ्याच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी जनावरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच राजुरी येथे लंम्पी आजाराने जर्सी गाईचा मृत्यू झाल्याने शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी शेतकरी निलचंद दुरंदे यांच्या जर्सी गायीची पाहणी केल्यानंतर  माहिती देतो असे सांगितले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-यांनी राजुरी येथे जाऊन लंपीमुळे मृत्यु झालेल्या गायीचा पंचनामा केला आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *