करमाळा (सोलापूर) : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर करमाळा शहरातही काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला आहे. दरम्यान ‘रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काॅग्रेसची विजयाची घोडदौड अशीच सुरु राहील’, अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचे धंगेकर विजयी

तालुकाध्यक्ष जगताप म्हणाले, ‘काॅग्रेसला संपवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी क्रांती ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातुन घडली आहे. अगदी लोकमान्य टिळकांपासुनची उधारणे आहेत. जे मध्यवर्ती पुण्यात होते तेच हळु- हळु संपुर्ण महाराष्ट्रात झाले आहे आणि पुढेही गतिमानतेने सुरू राहील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना जगताप म्हणाले, धंगेकरांचा विजय हा सामान्या जनता, बेरोजगार युवक युवती व्यापारी यांनी दिलेला जातीयवादी शक्ती आणि महागाईच्या विरोधातला कौल आहे.