सोलापूर : येथील हेरिटेज लॉनवर हजारोंच्या संख्येने युवा- युवतींनी हजेरी लावत गरबा, डांडिया आणि फैशन शोचा आनंद लुटला. आर आर कंस्ट्रक्शनचे रूपेश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या भव्य दांडिया, गरबा शो आणि Fancy Crew Fashion studio (फेंसी क्रु फैशन स्टुडिओ) चे मेकअप आर्टिस्ट अमृता कल्याणी, शितल मिरगणे, फेशन डिझाइनर रोहित उबाळे यांनी फैशन शोची चटकदार मेजवानी सोलापूरकरांना दिली. प्रविण जीन्स, ममता कलेक्शन, पाकिजा कलेक्शन यांचा महत्त्वपूर्ण सहभाग शोला लाभला.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे, चेतन नरूटे, विनोद भोसले, प्रशांत बडवे व मान्यवरांच्या उपस्थितीत शोचा शुभारंभ झाला. देवमाणूस सिरिअल फेम प्रतिक्षा जाधव (एक्ट्रेस) व डी. जे. आकाश यांची प्रमुख उपस्थिती सोलापूरकरांचे मनोरंजन करत दांडिया, गरबाचा ठेका धरला.

फैशन शो मध्ये शो स्टॉपर मानसी उबाळे व हर्षिता, फिमेल मॉडेल्स लक्ष्मी, नंदिनी, रुतुजा, वैष्णवी, प्रतिक्षा, ईशा, तेजस्वी, प्रियंका, सोनाली, अंजली, पूजा, प्रांजल आणि मेल मॉडेल श्रीकांत, यश, परवेझ, संतोष, प्रेम, मित, आदित्य, साहिल यांनी सहभाग घेऊन सोलापूरकरांकडुन प्रशंसा मिळवली. इव्हेंट यशस्वी रित्या पार पडण्यासाठी राकेश गायकवाड, कुनाल घोडके, अमिर शेख, अदनान, सागर शिंदे, मोंटी व इतरांचा पाठिंबा लाभला. यापुढे फेंसी क्रु फैशन स्टुडिओ लवकरच सोलापूरकरांचे मनोरंज करण्यासाठी सज्ज असेल.
