करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी आतापर्यंत आदिनाथसाठी 25 लाख दिले असल्याचे सांगितले. त्याची एंन्ट्रीही तपासू शकता असे म्हणताच कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी पैसे कोठे आहेत? असा प्रश्न केला. त्यावर बागल यांनी स्पष्टीकरण देताना यापूर्वी पैसे दिले असल्याचे सांगितले.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेत्या रश्मी बागल, दिग्वीजय बागल उपस्थित आहेत. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष अॅड. शशिकांत नरुटे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यकडे जाणारा हा कारखाना आदिनाथ बचाव समितीमुळे रोखण्यात यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत हे यासाठी मदत करत आहेत. हा कारखाना सुरु होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मदत करत आहेत, त्यामुळे त्यांचे चिवटे यांनी आभार मानले. दसर्याला कारखाना सुरु होऊ शकत नाही, जे शक्य आहे तेच लोकांना सांगा वस्तू स्थिती सांगून सभासदांचा विश्वास संपादन करा, असेही ते म्हणाले.
माजी आमदार नारायण पाटील यांना यावेळी संचालक म्हणून घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र मला अधिकार किंवा संचालक पद नको तर निवडणुकीत विजयी करा, असे पाटील यांनी सांगितले.
सभा अजूनही सुरु आहे. सभेत गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी रिप्रेश करा.