गट विकास अधिकारी राऊत, हर्षाली नाईकनवरे, कळसाईत, ठाकूर व लोंढे यांना श्रीमंती सोलापूरची

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सोलापूर फाऊंडेशनच्या वतीने करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील पाच कर्तुत्ववान व्यक्तीला ‘श्रीमंती सोलापूर’ची पुरस्काराने गौरविण्यात आले. यकल्याणी सेवाभवन येथे संत साहित्याचे अभ्यासक जेष्ठ पत्रकार ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक शिवाजी सरडे डॉ. निलेश मोटे, गणेश करे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 30) पुरस्कार वितरण सोहळा झाला.

करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत, प्रगतशील महिला शेतकरी हर्षाली प्रशांत नाईकनवरे, शेती अवजारे संशोधक बाबुराव कळसाईत, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकूर व प्रगतिशील शेतकरी पांडुरंग लोंढे यांचा गौरव झाला.

करे पाटील यांनी या पुरस्कारामागची भुमिका स्पष्ट केली. पुरस्कारार्थींचा परिचय करून देत इतरांसाठी दिशादर्शक कार्य करणाऱ्या या लोकांचे काम लोकांसमोर आणण्याचे काम ‘सोलापूर सोशल फाउंडेशन’ करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरडे, डॉ. मोटे व अॅड. हिरडे यांची यावेळी भाषणे झाली.

हर्षाली नाईकनवरे यांनी महिला गटाच्या माध्यमातून करत असलेल्या कामांची माहिती दिली. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने करमाळा शहरातील दोन शाळांना स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. सूत्रसंचालन विष्णू शिंदे यांनी केले.

भाजपाचे दीपक चव्हाण, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे विश्वस्त अविनाश करे पाटील, निवड समितीचे सदस्य प्रा. पाटील केमिस्ट असोसिएशनचे सचिन साखरे, सोलापूर फाऊंडेशनचे विजय कुचेकर, विपुल लावंड, जयेश पवार, प्राचार्य नारायण मोटे, शेटफळचे सरपंच विकास गुंड, विलास लबडे, वैभव पोळ, प्रतापसिंह लबडे, सुहास पोळ, अशिष पाटील, गंगाधर पोळ, नवनाथ नाईकनवरे, रोहीत लबडे, भाऊसाहेब लबडे, लहू पोळ, सचिन पोळ, पत्रकार गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *