करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीट येथून मुर्रा जातीची एक म्हैस चोरीला गेली आहे. या प्रकरणांमध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हरिश्चंद्र देवू ढेरे (वय 67, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. १६ ते १७ तारखेच्या दरम्यान ही म्हैस चोरीला गेली आहे. या म्हैसची किंमत साधारण 65 हजार रुपये आहे.
ढेरे यांनी 16 तारखेला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतात म्हैस बांधली होती. ते घरी आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सकाळी ते शेतात धार काढण्यासाठी गेले. तेव्हा शेतामध्ये बांधलेल्या ठिकाणी म्हैस नव्हती. म्हैस शेजारी इतर जनावरे बांधली होती. मात्र त्यातील म्हैसच चोरीला गेली आहे. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. तेव्हा म्हैस दिसून आली नाही. शोध सुरु असताना झरे व वीटच्या शिवेवर त्यांना म्हैस बांधलेले दावे मिळून आले. तेथेच काही अंतरावर गाडीच्या चाकाचे वर्ण दिसल्याने सदर म्हैस गाडीमध्ये भरून नेली असावी, असा त्यांचा संशय आहे.


