करमाळा पोलिसांचा मोर्चा आता Drink and Drive कडे; संघटनांनी केले कारवाईचे स्वागत

-

दारू पिऊन वाहन चालवणे हा कायदयाने गुन्हा आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन होताना अनेकदा दिसत आहे. याचा विरोधात करमाळा पोलिसांनी आता मोहीम सुरु केली असल्याचे दिसत आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर (Drink and Drive) थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा संशय आल्याबरोबर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून गुन्हा दाखल केला जात आहे.

Advertisement
Advertisement

करमाळा पोलिस ठाण्यात १३ दिवसात ४६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ५ गुन्हे दारू पिऊन गाडी चालवल्याचे आहेत. एका दिवसात ४ गुन्हे दाखल झाल्याचा यामध्ये समावेश आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. जिल्ह्यात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपासून ‘ऑपरेशन परिवर्तन’ मोहीम सुरु होती. यामध्ये हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना या व्यवसायांपासून प्रवृत्त करण्यात येत आहे.

करमाळा तालुक्यात पोलिस उपाधीक्षक डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या नियंत्रणाखाली काही गावे दत्त घेण्यात आली होती. तेथे अनेकांना दारू विक्रीचा व्यवसाय बंद करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करण्यात आली होती. ही मोहीम अजूनही सुरु आहे. दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघात होतात. अनेकदा यामध्ये नाहक एखाद्या व्यक्तीचा जीवही जातो. याला आळा बसणे आवश्यक आहे. त्यामुळेच करमाळा पोलिसांनी Drink and Drive कडे मोर्चा वळवला असून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे.

पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले, दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे. अनेकजण दारू पिऊन गाडी चालवत आहेत, असे लक्षात आले आहे. त्यातूनच हे प्रमाण कमी व्हावे म्हणून गाड्यांची तपासणी करून कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसात सुमारे ६० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवाल्याने अपघात होत आहेत. हे अपघाताचे प्रमाण थांबणे आवश्यक आहे. वाहन चालवताना कोणीही गाडी चालवू नये.

बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर म्हणाले, पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. याचे आम्ही स्वागत करत आहोत. दारू पिऊन कोणीही गाडी चालवू नये. दारू पिल्याने अनेकांच्या संसाराची वाताहत होत आहे. दारू पिऊन गाडी चालविल्याने अपघात होतात. त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *