करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिसात एकाच दिवशी २१ वर्षाची एक महिला व २१ वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाली असल्याची नोंद झाली आहे. सोमवारी (ता. २२) हरवले असल्याची म्हणून ही झाली आहे. यामध्ये तालुक्यातील बाळेवाडी येथून २१ वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाली आहे. त्याची नोंद करमाळा पोलिसात हरवले असल्याची म्हणून झाली आहे. तर दुसरी महिला सातोली येथील आहे.

सातोली येथील बेपत्ता झालेली महिला २१ वर्षांची आहे. राहते घरातून ही महिला बेपत्ता झाली आहे. ते बेपत्ता झालेली बाळेवाडी येथील मुलगी २१ वर्षांची आहे. करमाळा पोलिसात नोंद झाल्यानंतर याचा तपास सुरु झाला आहे. काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. १४ ते २२ऑगस्ट दरम्यानसोलापूर जिल्ह्यातून ३८ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात १३ पुरुष व २५ महिला आहेत. याच्या नोंदी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात झाल्या आहेत.

