करमाळा (सोलापूर) : येथील नंदन प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आज (शुक्रवारी) हभप गीतांजली अभंग महाराज यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. काही वेळातच हे कीर्तन सुरु होणार आहे. नंदन प्रतिष्ठानचे हे गणेशोत्सवाचे पहिलेच वर्ष आहे. नंदन प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. त्यातूनच गीतांजली अभंग महाराज यांचे कीर्तन होणार आहे. याचा करमाळकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. श्री संताजीनगर डॉ. दुधे यांच्या हॉस्पिटल जवळ हे कीर्तन होणार आहे.