केम ते तुळजापूर एसटी बस सुरु; भाविकांनी देवदर्शनाला जाण्यासाठी बसचा लाभ घेण्याचे आवाहन

Kem to Tuljapur ST bus started

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
Advertisement
तालुक्यातील केम येथून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेसापासून (सोमवारी ता. २६) केम- कुर्डूवाडी- बार्शी- तुळजापूर ही एसटी बस सुरु झाली आहे. भाविकांनी देवदर्शनाला जाण्यासाठी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रहारचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्यासह गावातील नागरिकांनी यावेळी बस चालक व वाहक यांचे स्वागत केले.

केम ते तुळजापूर अशी एसटी बस सेवा सुरू व्हावी म्हणून प्रहार व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता. या बसमुळे केमसह परिसरातील 10 ते 15 गावातील नागरिकांना तुळजापूरला देवदर्शनासाठी जाता येणार आहे. याशिवाय बार्शी व कुर्डूवाडी येथे जाता येणार आहे. शेतकरी, नोकर वर्ग, शालेय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जाण्या- येण्याची व्यवस्था या बसमुळे झाली आहे.

केम व आजूबाजूच्या नागरिकातून केम- तुळजापूर बस सेवा सुरुवात करण्यासाठी मागणी होत होती. याची दखल घेत प्रहार व राष्ट्रवादीच्या गावातील कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व नागरी या सर्वांनी मिळून बस सेवा किती महत्त्वाची आहे. हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. केममध्ये ग्रामसभा घेत ग्रामसभेमध्ये केम- तुळजापूर एसटी सुरु होण्यासाठी केम ग्रामपंचायत यांनी ठराव मंजूर करून दिला.

तालुकाध्यक्ष तळेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांना पत्र दिले होते. सचिन रणशिंगारे, भाजप करमाळा तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, सुहास वेदपाठक, दिलीप जाधव, बाळासाहेब देवकर, कुबेर तळेकर यांनी पाठपुरावा केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *