२० हजारासाठी भाळवणीतील एकाचे अपहरण; जेऊरमधील एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

Kidnapping of one of Bhalwani for 20 thousand

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील भाळवणी येथील एकाचे 20 हजारासाठी अपहरण केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अपहरण झालेल्या व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून जेऊर येथील एका संशयिताविरुद्ध गुप्तपणे व गैरपणे पळून नेल्याप्रकरणी कलम ३६५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सनी टकले (रा. जेऊर, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे तर राहुल बाळू फरतडे (वय 28, रा. नवीन गावठाण भाळवणी, ता. करमाळा) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीचा भाऊ केळी व्यापारी तानाजी बाळू फरतडे (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे.

फरतडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 20 ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास संशयित आरोपी सनी टकले हा घरी आला होता. भाऊ राहुलला पुणे येथील गुलटेकडी मार्केटला घेऊन जायचे आहे असे तो म्हणाला. त्यानंतर भाऊ राहुलला घेऊन तो गेला. तेव्हा भावाजवळ मोबाईल होता. दुसऱ्या दिवशी 21 तारखेला भावाच्या मोबाईलवर फोन करून पाहिले तेव्हा त्याचा फोन बंद होता.

त्यानंतर अण्णासाहेब पारेकर (रा. पांगरे) यांनी मला संशयित आरोपी सनी टकलेच्या गेस्ट हाऊसवर ये म्हणून सांगितले. त्यामुळे मी सनी टाकले याच्या मलवडी हद्दीतील गेस्ट हाउसवर गेलो. तेथे सनी टकले व अण्णासाहेब पारेकर होते. दरम्यान भावाबाबत त्यांना विचारणा केली तेव्हा सनी टकले म्हणाला, ‘तुझ्या भावाकडे माझे २० हजार होते. म्हणून त्याला उचलून आणले होते. परंतु तुझा भाऊ काल संध्याकाळीच पळून गेला आहे. तू भावाने घेतलेले पैसे दे. नाहीतर त्याला माझ्या शेतामध्ये कामाला ठेवीन’.

तेव्हा त्याला ‘माझ्या भावाने घेतलेले पैसे देऊन टाकीन तो कुठे आहे? सांगा म्हणालो तेव्हा सनी टकले मनाला तुझा भाऊ पळून गेला आहे. त्यानंतर 22 ते 23 तारखेला नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो सापडला नाही. त्याचा फोनही बंद लागत आहे. संशयित आरोपी सनी टाकले यांनीचा भावाला गुप्तपणे व गैरपणे पळून नेले आहे.’ असे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *