करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बोरगाव येथील ऍड. शशिकांत नरुटे यांच्या मातोश्री सुंदराबाई नरुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हभप बळीराम वायकर महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी माजी आमदार नारायण पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील, तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, करमाळा ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, आबासाहेब पारेकर, डॉ. शेळके, ‘काय सांगता’चे पत्रकार अशोक मुरूमकर, पत्रकार विशाल परदेशी, दगडू भोरे, किरण पाटील, दादा पाटील, हभप गायनाचार्य बाप्पा गायकवाड, गजानन पिसाळ, शिवाजी सूर्यवंशी, पखवाज वादक मृदुंगमणी हभप आदिनाथ महाराज घाडगे, अर्जुन कांबळे, बापूराव वाघमोडे उपस्थित होते. प्रा. दुर्गुडे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. शशिकांत नरुटे यांनी आभार मानले.