Video : वारे यांच्या प्रयत्नाला यश; कामोणे तलावात कुकडीचे पाणी दाखल होताच पूजन

Kukadi water in the pond at Kamone in Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कामोणे येथील तलावात कुकडीचे पाणी आले आहे. या पाण्याचे पूजन गावातील जेष्ठ नागरिक अर्जुन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कुकडीतील ओहोरफ्लोचे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर येथे पाणी सुटले आहे, अशी भावना व्यक्त करत येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील अनेक धरणे भारत आली आहेत. मात्र अद्याप करमाळा तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत. निम्मा पावसाळा संपत आला आहे त्यामुळे ओहोरफ्लोच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील कुकडी धरण लाभक्षेत्रात येणारे तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करत वारे यांनी नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथे पाणी आले आहे. वारे यांच्या या प्रयत्नाला हे यश आले आहे, असे राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी सांगितले आहे.

कामोणे येथे तलावात पाणी पूजन झाले तेव्हा उपसरपंच संदीप नलवडे, सोमनाथ भिसे, मधुकर जाधव, चिंटू भालेराव, औदुंबर नलवडे, अजय पवार, लक्ष्मण भालेराव, दीपक देवकते, कृष्णा भिसे, चंद्रकांत पवार, गणेश वाल्मिक शिंदे, सौरभ देमुंडे, पांडुरंग नलवडे, अशोक देवकते, तुळशीराम देमुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *