देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले. यामुळे सर्वांच्या मनात भिती निर्माण होत आहे. त्यातच हवामान विभागाने गुड न्यूज दिली आहे. यावर्षी मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पहिल्या टप्प्याचा दिर्घकालीन अंदाज जाहीर झाला आहे. त्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजामुळे दिलासा मिळत आहे.
यावर्षी पावसाची दिर्घ कालावधीतील पाच टक्के फरकानुसार ९८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलामुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
1961 ते 2010 या कालावधीत देशाचे मान्सून पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर म्हणजेच 880 मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मान्सून मध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक तर दुष्काळाची शक्यता 14 टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या अंदाजामध्ये शंभर टक्के तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजामध्ये 102 टक्के पाऊस पडण्याचा शक्यता वर्तवली होती. अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने राज्यनिहाय पडणाऱ्या संभाव्य पावसाची स्थिती दर्शवणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 35 ते 55 टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर