करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढारचिंचोली येथील मानसी श्रीपती गलांडे या विद्यार्थीनेने ‘नीट’ परीक्षेत ६०७ गुण मिळवले आहेत. याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांनी तिचा शुक्रवारी (ता. २३) विठ्ठल निवास येथे सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, गौतम जगदाळे, टाकळीचे सरपंच डॉ. गोरख गुळवे, वीटचे सरपंच उदय ढेरे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुहास गलांडे उपस्थित होते.


