करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढारचिंचोली येथील मानसी श्रीपती गलांडे या विद्यार्थीनीने 607 गुण मिळवून ‘नीट’ परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. मानसीचे प्राथमिक शिक्षण कोंढारचिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण भिगवण येथील आदर्श विद्यालयात झाले व उच्च माध्यमिक शिक्षण भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्था येथे झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांची ती पुतणी आहे.
मानसीचे कुटुंब शेतकरी आहे. सातत्याने व चिकाटीने अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे. आई- वडील व कुटुंबाची प्रेरणा घेऊन तिने अभ्यास केला. तिला तिच्या कॉलेजमधील शिक्षकांसह लातूर येथील क्लासमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.


