रिटेवाडी उपसा सिंचनसंदर्भात 3 फेब्रुवारीला मुंबईत बैठक

Meeting in Mumbai on February 3 regarding Ritewadi lift irrigation

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे ३ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात या आधी बैठक घेतली होती. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

चिवटे म्हणाले, रिटेवाडी उपसासिंचन योजनेचा प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा केला होता. शिवसेनेच्या या प्रयत्नाला आता यश येत असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मकाई सहकारी साखर कारखाना माजी अध्यक्ष दिग्विजय बागल आदी उपस्थित राहणार आहेत. तालुक्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न असून लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *