‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जनशक्तीने रणशिंग फुंकले; करमाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक

Meeting of Jan Shakti Sanghant for election of Zilla Parishad and Panchayat Samiti in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे अतुल खुपसे यांच्या जनशक्ती सघंटनेने शनिवारी (ता. ३०) रणशिंग फुकले आहे. आरक्षण जाहिर होताच संघटनेने कार्यकर्त्यांची करमाळा येथील श्री दत्त मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये मनोगतात सत्ताधारी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटावर काही कार्यकर्त्यांनी निशाणा साधला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणावर 2 ऑगस्टपर्यंत हरकती

खुपसे यांच्या माध्यमातुन संघटनेने केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. करमाळा शहरातील कचारा, रस्ते या विषयावरही भाष्य करत नगरपालिकेतील सत्ताधारी जगताप गटावरही काही कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. आमदार शिंदे यांनी माढा तालुक्यातील ३६ गावात विकास केला नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ६ गट व पंचायत समितीच्या १२ गणात उमेदवार देण्याची मागणी कर्यकर्त्यानी खूपसे यांच्याकडे केली. या बैठकीत महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीती होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उल्लेख फलकावर केलेला असला तरी करमाळा शहरातीलही काही कार्यकर्ते उपस्थित होते. खूपसे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *