मुंबई : भाजपचे मोहित कंबोज यांनी बारामती ऍग्रोबाबत केलेल्या ट्विटला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. ‘मोहित कंबोज हे प्रसिद्धीसाठी खटाटोप करत आहेत. त्यांना मी फार महत्व देत नाही’, असे म्हणत पवार यांनी त्यांना उत्तर दिले आहे. याबरोबर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कंबोज यांच्यावर टीका केली आहे.
बारामती ऍग्रोबाबत भाजपचे मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट
भाजपचे मोहित कंबोज यांनी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोबाबत ट्विट केले. त्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. बारामती ऍग्रोचा अभ्यास सुरु केला असल्याचे ट्विट कंबोज यांनी केले होते. त्यामुळे कंबोज यांच्या निशाण्यावर आमदार रोहित पवार हे आले असल्याची चर्चा आहे. यावर आमदार पवार यांनी उत्तर दिले असून कंबोज हे प्रसिद्धीसाठी खटाटोप करत आहेत. त्यांच्याकडे मी फारसे महत्व देत नाही, असे ते म्हणाले.

याशिवाय कंबोज यांच्या ट्विटकवरून आमदार मिटकरी यांनीही टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, ‘मोहित कंबोज नावाच्या भोंग्याला महत्व देत नाही. त्यांनी एसीत बसून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष दौरा करावा,’ असे म्हणत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांचा समाचार घेतला आहे. ट्विट करण्यापेक्षा मोहित कंबोज यांनी दौरा करावा. अभ्यास करण्यासाठी मेंदू असावा लागतो. त्यांनी बारामतीचा दौरा करावा. मोहित कंबूज नावाच्या भोंग्याला महत्व देत नाही. पवार यांनी मेळघाटात जाऊन दौरा केला. तसा कंबोज यांनी दौरा करून कुपोषित भागाचा दौरा करावा. त्या प्रश्नावर त्याने बोलावे, असे मिटकरी म्हणाले आहेत.

