करमाळा (सोलापूर) : शिंदे गट शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातून १५०० पेक्षा जास्त कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. आतापर्यंत २०० गाड्या तयार झाल्याअसून अजूनही कार्यकर्त्यांच्या गाड्यांचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती करमाळा तालुका प्रमुख देवानंद बागल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिंदे गट शिवसेनेचा भव्य असा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी इच्छुक आहेत, असे ते म्हणाले आहेत.

मुंबईत शिवसेनेचा (शिंदे) दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी करमाळा तालुका शिवसेनेकडून (शिंदे) नियोजन केले जात आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त कार्यकर्त्याने उपस्थित राहतील असा अंदाज आहे. जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह नव्याने नियुक्त करण्यात आलेले कार्यकर्ते मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन करत आहेत. करमाळ्यातून अनेक कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

