करमाळा (सोलापूर) : मंत्री मंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे द्यावी, अशी विनंती केली आहे, असे भाजपचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘काय सांगता’ या न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. खासदार निंबाळकर हे आज (गुरुवारी) करमाळा आहेत. प्रशासकीय आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी ‘काय सांगता’शी संवाद साधला. भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल उपस्थित होते.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात….