करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह ओहोळ यांनी जुलैमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर 1 सप्टेंबरला केम येथे गणेश तळेकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याबाबत ओहोळ यांनी माहिती दिली.
तेव्हा खासदार निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन लावला. त्यावर त्यांनी आपणही प्रस्ताव द्यावा आम्ही पुढे पाठवतो, असे सांगितले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कित्येक वर्षांपासून केम हे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. गावात रेल्वे, रस्ते, पाणी, वीज, शेती विषयक अनेक समस्या आहेत.

2021 मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडून अप्पर तहसीलसाठी निवेदन दिलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून श्रेय घेण्यासाठी निवेदन दिले आहे का? अशी खंत ओहोळ यांनी व्यक्त केली. अप्पर तहसीलसाठी जिल्हाधिकारी यांनी महसूल मंत्र्याकडे प्रस्ताव देणे अत्यंत महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रहार संघटनेला बरोबर घेऊन अप्पर तहसीलचा विषय आम्हीच मार्गी लावणार असेही त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

