Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम

करमाळा (सोलापूर) : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुणांनी एक संकल्प करून एकत्र येत प्रतिष्ठानची स्थापना केली. गणेशोत्सवाचे त्यांचे पहिले वर्ष असले तरी सामाजिक उपक्रमांमध्ये वाहून घेतलेली ही मंडळी आहे. श्री संताजीनगर डॉ. दुधे यांच्या हॉस्पिटल जवळ येथे या मंडळाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना गेली आहे. आपण ज्या प्रतिष्टानबद्दल बोलतोय ते म्हणजे नंदन प्रतिष्टान!

डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, अभियंता, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन ठेऊन नंदन प्रतिष्ठान स्थापन केले. त्या माध्यमातून त्यांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवात अनावश्यक खर्चांना फाटा देऊन त्यांनी सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पर्यावरणाबाबत जनजागृती यावर त्यांनी जनजागृती केली आहे. ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत तेथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे.

या परिसरात त्यांनी विद्युत रोषणाई केली आहे. शिवाय बाप्पाची आकर्षक सजावट केली आहे. तेथेच त्यांनी जनजागृतीचे फलक लावले आहेत. बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भक्ताचे हे फलक लक्षवेधून घेत आहेत. अनावश्यक खर्च टाळून त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. गणेश विसर्जन मिरवणूक न काढता साधेपणाने विसर्जन केले जाणार आहे. कीर्तन, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर असे उपक्रम ते राबवत आहेत. शुक्रवारी युवा कीर्तनकार गीतांजली अभंग महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

मंडळाची कार्यकारणी…
नंदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष : जितेश कटारिया, उपाध्यक्ष : प्रकाश क्षिरसागर, गणेशोत्सव समिती अध्यक्ष : डॉ. सतीश गोयेकर, उपाध्यक्ष : अमोल रोकडे, कार्याध्यक्ष : नितीन व्हटकर गुरुजी, खजिनदार : रोहित कोळेकर, नियोजन समिती : निलेश माने, सजावट प्रमुख : निलेश भुसारे, सदस्य : महेश क्षिरसागर, दीपक देवकर, सचिन चव्हाण, अक्षय परदेशी, आश्विन जव्हेरी, बिभीषण कुदळे, सौरव कोळेकर व दादा भांडवलकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *