करमाळा (सोलापूर) : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करमाळा पंचायत समितीच्या वतीने करमाळा शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (रविवारी 14 अॉगस्टला) भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हालगीच्या तालावर लेझीम खेळण्याचा आनंद घेतला.
करमाळा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. करमाळा तहसील कार्यालय येथून ही रॅली निघाली. करमाळा शहरातील सर्व महापुरुषांना या रॅलीच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत सहभागी झाले होते.