करमाळा (सोलापूर) : महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व पंचायत समिती यांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालय आवारात आज (रविवारी) स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला संदीप पाटील प्रस्तुत ‘वंदे मातरम’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातूनच करमाळा येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होत आहे. यामध्ये नागरिक आपल्या आवडत्या हिंदी व मराठी देशभक्तीपर गीताची फर्माईश करू शकणार आहेत.



