करमाळा (सोलापूर) : मोहरमनिमित्त (ताजिया) शहरातील किल्ला विभाग येथील बारवेजवळ स्थापन होणाऱ्या शहरातील सर्वात मोठ्या ‘नालेहैदर’ (नाल साहब) पंजाची मंगळवारी (ता. 9) शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक ढोल, ताशा, हलगीच्या निनादात शहरात विविध ठिकाणी स्थापन होणाऱ्या सवारी (पंजे) यांची भेट घेत किल्ला वेस, फुलसौंदर चौक, ज़य महाराष्ट्र चौक, दत्तपेठ, सुभाष चौक पंजाब वस्ताद चौक मार्गे ही मिरवणूक निघाली. ‘नालेहैदर’ पंजाच्या मिरवणुकीत मुस्लिम समाजासह सर्व जाती धर्माचे लोक उत्साहात सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान भाविकांनी पुष्पवृष्टीसह रेवडी उधळत या पंजाचे उत्साहात स्वागत केले.
संपादन : विशाल परदेशी




