करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील ‘काय सांगता’च्या कार्यालयात शिक्षक दिनानिमित्त सोमवारी (ता. ५) शिक्षक अण्णा काळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार विशाल घोलप, डॉ. नरेंद्रसिंह ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार विशाल परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वाघमारे, घोलप, साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अशोक मुरूमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी काळे यांनी सत्काराला उत्तर दिले. आपण जे काम करतो ते प्रमाणिकपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले.


