करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाडळी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची रविवारी (ता. ७) जयंती साजरा करण्यात आली. यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजनावेळी पाडळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने हा जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिमा पूजनानंतर डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वारे यांनी कार्यकर्त्यांबरोबर ठेका धरला.
