करमाळा (सोलापूर) : बांधावरील गवत का काढले म्हणत लाकडी काठीने व गजाने पाठीवर व डोक्यात मारहाण करून एकाला जखमी केले असल्याचा प्रकार तालुक्यातील निभोरे येथे घडला आहे. यामध्ये एकाच्या फिर्यादीवरून तिघा बाप- लेकांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आई व वडील मारहाण सोडवायला आले तेव्हा त्यांनाही दगडाने मारहाण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

देविदास ज्ञानदेव सलगर, मंगेश देविदास सलगर व महेश देविदास सलगर (सर्व रा. निंभोरे) या तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नवनाथ सलगर (वय ३३, व्यवसाय शेती, रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व गुन्हा दाखल झालेले संशयित यांची एकमेका शेजारी शेती आहे. फिर्यादीचा ऊस तोड सुरु आहे. उसाचा ट्रॅक्टर जात असताना हा वाद झाला आहे.