करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभूर्णी मार्गावर मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देवळाली (ता. करमाळा) जवळ एका कारचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातील कार करमाळ्याहून जेऊरच्या दिशेने जात होती. अचानक कार उलटून दुभाजकावर अडकली.
अपघातावेळी गाडीत पाच जण होते. या अपघातात एकाचा मृत्यू होवून तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त हे चिखलठाणला निघाल्याचे सांगण्यात येत होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील स्थानिकांनी घटनास्थळी जात मदत पोहोचवली. यामध्ये अक्षय गायकवाड, राहूल कानगुडे, सुधीर आवटे, नारायण कोळे, काळू दामोदरे यांनी तात्काळ मदत देत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.
जखमींना उपचारासाठी कुटीर रुग्णालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शीला पाठविण्यात आले. सदरसाठी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत झाली.
संपादन : अशोक मुरुमकर