करमाळा (सोलापूर) : ‘मी सोलापूर स्कॉडचा पोलिस आहे. येथे चेकिंगला आलो आहे. तुमच्यावर माझा संशय आहे’, असे म्हणून ७२ वर्षाच्या एकाची फसवणूक केली असल्याचा प्रकार करमाळा शहराजवळील मौलाली माळ येथे घडला आहे. 22 तारखेला दुपारी २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये गळ्यातील सोन्याची ६ ग्रॅमची 30 हजाराची चैन लंपास केली आहे. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील दीपक सदाशिव दराडे (वय 72) यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे.

दराडे यांनी फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, २२ तारखेला मोटरसायकल दुरुस्तीसाठी करमाळा येथे आलो होतो. मोटरसायकल दुरुस्त झाल्यानंतर गावाकडे निघालो होतो. तेव्हा मौलालीमाळ येथे आलो असता मागून एक विनानंबरची मोटरसायकल आली. त्यावरील एक अनोळखी व्यक्ती खाली उतरला. तो म्हणाला ‘काका इकडे या. मी सोलापूर स्कॉडचा पोलिस आहे. मी चेकिंगला आलो आहे. काल येथे गांजा व चरस सापडला आहे. तुमच्यावर माझा संशय आहे.’

तेवढ्यात मागून दुसरी मोटरसायकल आली. माझ्यासमोर त्या व्यक्तीला तुला चकिंग करायचे आहे. तो म्हणाला तुमचे आयकार्ड दाखवा. त्यानंतर माझ्यासमोर त्या व्यक्तीने बनाव करून आयकार्ड दाखवले. त्यावर तो म्हणाला तुमच्याकडील साहित्य बाहेर काढा. ते तुमच्या रुमालामध्ये चालणार नाही. माझ्या रूमलामध्ये टाका नंतर माझ्या गळ्यातील सोन्याची ६ ग्रॅमची चैन रुमालामध्ये टाकली. तो रुमाल माझ्याकडे दिला व त्याने हात चलकीने खिशात टाकली व लगेच मोटरसायकलला किक मारून निघून गेला. तो करमाळ्याच्या दिशेने गेला. त्यानंतर त्याचा पाठलाग केला पण सापडला नाही.’ यामध्ये फसवणूक केली असल्याचा गुन्हा अनोळखी व्यक्तीविरुद्ध दाखल झाला आहे.
