सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज व उद्या (29 व 30 ऑगस्ट 2022) पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आयटीआय टर्नर, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, बीएससी, एमएससी, एमबीए केमेस्ट्री, इंजिनिअर, सेल्स एक्झीक्युटीव अशा प्रकारची एकूण 193 रिक्तपदे 7 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत.

इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
