फिसरेजवळ पिकअपला एसटी बसची धडक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील फिसरे येथे पिकअप व एसटीची धडक झाली आहे. यामध्ये जखमी कोण झालेले नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणात पिकअप चालक हनुमंत अनिरुद्ध पवार (वय 24, रा. केडगाव) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून भूम आगारातील एसटी बस चालक राम केरबा सराणे (वय ४०, रा. पारा, ता. वाशी, जिल्हा, उस्मनाबाद) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एसटी व पीकपचे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.

यामध्ये पीकपचे चालक पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, केडगाव येथील सोमनाथ घाडगे यांच्या पीकपवर मी चालक आहे. टोमॅटो भरून केडगाव येथून उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील मार्केटमध्ये पिकअप गेले होते. तेथून टोमॅटोविक्री करून केडगावला जात असताना फिसरजवळ आल्यानंतर एसटी बसने मागून पीकपला जोराची धडक दिली. २ तारखेला सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र पीकपचे १० हजाराचे व एसटी बसचे ४० हजाराचे असे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *