करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सवानिमित्त तालुक्यातील सालसे येथील पैलवान ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव निमगाव टें.चे सरपंच यशवंत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथे मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. या अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने वृक्षरोपणे केले आहे. दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरन करण्यात आले. पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सुभाष घाडगे, उपाध्यक्ष सोमनाथ सपकाळ, पैलवान ग्रुपचे मार्गदर्शक मल्ल सम्राट केसरी पैलवान भरत लोकरे, गौरव घाडगे, सुरज ढेरे, रविराज सालगुडे, सुरज पवार, दिनेश सालगुडे, दिनेश लोकरे, शिवाजी लोकरे, सुरज सालगुडे उपस्थित होते.


