करमाळा (सोलापूर) :

नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर १
नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर १ येथे स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमितीत विविध कार्यक्रम झाले. ९ ऑगस्टला क्रांती दिनी शाळेत समूह राष्ट्रगीत गायन झाले. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी, प्रभात फेरी, माता पालक मेळावा, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अर्थसाक्षरता, मोबाईलचे दुष्परिणाम, बचतीची सवय सांस्कृतिक असे कार्यक्रम घेऊन सोमवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन झाले.यावेळी महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या वेषभूषेने रॅलीने लक्ष वेधले. मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदना झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल फंड, माजी नगरसेविका स्वाती फंड, माजी नगरसेवक नवनाथ राखुंडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण जगताप, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते सचिन काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या शिंदे यांनी तर आभार भाग्यश्री पिसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकला टांगडे, सुवर्णा वेळापुरे, भालचंद्र निमगिरे, सुनिता क्षिरसागर, रमेश नामदे, मोनिका चौधरी, तृप्ती बेडकुते, निलेश धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या सल्लागार द्रोपदी वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, स्कूलच्या प्रिन्सिपल धनश्री दळवी, सहशिक्षिका सीमा कोरडे, शिवांगी शिंदे, हेमा शिंदे, राधा बगडे, पल्लवी माळवे, फरहान खान, कोमल बत्तीशे, अंजुम कांबळे, सविता पवार, मन्सूर तांबोळी, अंकुश नाळे, गणेश पवार, राहुल पलंगे यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भारत माता, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आदी स्वातंत्र्य विरांची वेशभूषा साकारली होती.

धर्मवीर संभाजी विद्यालय
तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयमध्ये स्वातंत्र्य दिनानिमीत्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनरल नॉलेज परीक्षा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवनाद सांस्कृतिक कलामंचचे संस्थापक विजयजी खंडागळे यांच्या ग्रुपकडुन प्रत्येक वर्गातील एक मुलगा दक्तक घेऊन त्यांचा वार्षिक खर्च ग्रुपने उचलला आहे. भारत अवताडे व पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, माजी सैनिक तुकाराम चव्हाण आदींच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर डान्स तसेच गायन केले. संस्थेचे सचिव हरिदास काळे, संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक बापू निळ, उत्तम हनपुडे, संगीत विशारद विजय खंडागळे, सर्पमित्र माधव हनपुडे, गौंडरेचे सरपंच सुभाष पाटील, चंद्रकात अंबारे, माजी सरपंच अजिनाथ सपकाळ, वसंत अंबारे, अण्णा सपकाळ उपस्थित होते.

रावगाव येथे विविध कार्यक्रम
रावगाव येथे विविध कार्यक्रम
रावगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत, वाचनालय, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यावर जनजागृती अभियान घेण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यांच्या वतीने रांगोळी, निबंध, वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण मोफत झेंडे वाटप करण्यात आले. राजीव गांधी वाचनालयाच्या वतीने सैनिकांचा सन्मान, पथनाट्य, प्रभात फेरी, जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच विष्णू गर्जे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच दादासाहेब जाधव, राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय येथे केंद्रीय मुख्याध्यापक बहिरू गबाले, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसभापती चिंतामणी जगताप, संचालक आनंदकुमार ढेरे, अमोल झाकणे, संतोष वारे, सचिव विठ्ठल क्षिरसागर, रविंद्र उकीरडे, महेश ढाणे, रतन काळे, वसंत बरडे, श्रीकांत शिंदे, सुरेश भांडवलकर, अमोल नलवडे उपस्थित होते. यावेळी देशभक्त नामदेवरावजी जगताप व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

करमाळा किल्ला विभाग लोकमान्य टिळक पुतळा
करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे शिवसेना महिला तालुका प्रमुख शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा झाले. यावेळी मंजिरी जोशी, सोनाली देवी, अश्विनी खळदकर, भारती लष्कर, कविता कांबळे, प्रिती पाटील, प्रज्ञा जोशी, मरियमबी पठाण, अहिल्या सातपुते, सारिका सातपुते, शितल वडे, धनश्री सातपुते, सिमरन पठाण, अपूर्वा कापसे, पल्लवी ननवरे, शांता कदम, जयश्री कांबळे उपस्थित होत्या.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत, अशितोष घुमरे, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने, महाविद्यालयाचे माजी प्रबंधक कैलास देशमुख, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे प्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड उपस्थित होते. महाविद्यालयातील एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धातील विद्यार्थ्यांना गुणांक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एनसीसीचे CT0 निलेश भुसारे यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता भोरे यांनी तर आभार प्रा. मुक्ता काटवटे यांनी मानले.

शेटफळ येथील तरूणांचा श्रमदानातून वृक्षलागवड उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेटफळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील तरूणांनी लोकवर्गणी करून १६ प्रकारच्या ७५ वृक्षांची लागवड केली. यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजनही केले आहे. सरपंच विकास गुंड, उपसरपंच आजित नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरूणांनी लोकवर्गणी जमा करून वृक्षांच्या रोपांची खरेदी करून श्रमदानातून शाळेच्या आवारात लागवड केली. यावेळी सुहास पोळ, विठ्ठल गुंड, प्रशांत नाईकनवरे, बाबुराव नाईकनवरे, चेतन पोळ, सागर पोळ, गजेंद्र पोळ, संदीप पोळ, अक्षय गुंड, रणजित लबडे, विशाल पोळ, शहाजी रोंगे, धनाजी गायकवाड, नागनाथ पोळ, नवनाथ गुटाळ, हरिश्चंद्र गुंड, नागनाथ नलवडे, योगेश घोगरे यांच्यासह गावातील तरूणांनी श्रमदानातून वृक्षलागवड मोहीमेत सहभाग नोंदवला.

कुंभेज ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
कुंभेज ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिनानिमीत्त आजी- माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या नावाचा बोर्ड ग्रामपंचायत ऑफिसमध्ये लावण्यात आला. अण्णासाहेब भोसले व शिवराजे ग्रुपच्या संकल्पनेतून फलक लावण्यात आला. आजी- माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुकाचे अध्यक्ष मेजर अक्रूर शंकरराव शिंदे, मेजर बिभीषण कन्हेरे, मेजर सुभाष मुटके, मेजर बाळासाहेब शिंदे, हुतात्मा जवान आप्पासाहेब काटे यांच्या मातोश्री व त्यांचे भाऊ भारत काटे, सरपंच सौ. गायकवाड, उपसरपंच संजय तोरमल, अण्णासाहेब साळुंखे, युवराज भोसले, बाबासाहेब माळी, संतोष चांदणे उपस्थित होते.
– करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
– करमाळा तहसील कार्यालयात झळकला ‘तालुक्याचा ऐतिहासिक वारसा’
– करमाळ्यात पहिल्यांदाच! देशभक्तीपर गीतांनी रंगली स्वातंत्र्य दिनाची ‘पूर्वसंध्या’
– करमाळा पंचायत समीतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रॅली काढत महापुरुषांना अभिवादन
–



