‘हर घर तिरंगा’साठी करमाळ्यात पोलिसांचे पथसंचलन

Police march in Karmala for Har Ghar Tiranga

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सुनील सावंत आक्रमक! तुंबलेली गटार त्वरित काढा, अन्यथा हेच पाणी पालिकेत टाकू

आझादी का अमृतमहोत्सवअंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी पथसंचलन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या पथसंचलनमध्ये करमाळा पोलिस ठाणेकडील 6 अधिकारी व 35 अंमलदार तसेच पोलिस मुख्यालयाकडील राखीव पोलिस निरिक्षक काजुऴकर, राखीव पोलिस उपनिरीक्षक काटे, पोलिस बँड पथक व 45 अंमलदार उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी सैनिक यांचे पथक, एनसीसीचे विद्यार्थी पथक, एनएसएस विद्यार्थी पथक यांनी सहभाग घेतला होता.
नातवाची आजोबाला दगडाने मारहाण जावईला चावा; आळजापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा
करमाळा पंचायत समितीचे आरक्षण बदलणार का? ५ तारखेला फैसला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *