जेऊर कोविड सेंटरवरुन आमदार शिंदे व पाटील यांच्यात कसा रंगला श्रेयवाद

करमाळा (सोलापूर) : जेऊर येथील कोविड सेंटरवरुन आमदार संजय शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्यात संध्या चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार शिंदे यांनी येथील रुग्णालयाची इमारत २०१७ पासून धूळ खात पडली होती असा टोमणा पाटील यांना त्यांचे नाव न घेता लागावला होता. त्यांनर शिंदे यांनी रविवारी या रुग्णालयाची पाहणी केली होती. याबाबतचे वृत्त ‘करमाळा लाईव्ह’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर माजी आमदार पाटील यांनी यावर प्रतिक्रीया दिली असून हे रुग्णालय आपण मंजुर करुन घेतले होते. कोविड सेंटरसाठीही पाठपुरवा केला होता असे ते म्हणाले आहेत.

आमदार संजय शिंदे यांनी केली पाहणी
आमदार संजय मामा शिंदे यांनी रविवारी जेऊर येथील उपजिल्हा रूग्णालयला भेट दिली. यावेळी आढावा घेऊन प्रशासनाशी चर्चा करून जेऊरमध्ये कोव्हीड सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या. येथील अडीअडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढून कोविड सेंटर चालू होण्यासाठी ची प्रक्रिया गतिमान केली व तशा सूचना संबधीत विभागांना दिल्या.

आमजी आमदार पाटील यांचे मत
करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आज जेऊर येथील उपजिल्हा रूग्णालयला भेट दिली, यावेळी आढावा घेऊन प्रशासनाशी चर्चा करून जेऊर मध्ये कोव्हीड सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या.
जेऊर (ता. करमाळा) येथे लवकरच कोरोना रुग्णासाठी कोविंड सेंटर सुरु होणार आहे, अशी माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, राज्याचे तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या मार्फत जेऊर येथे ग्रामीण रुग्णालयासाठी ३० खाटांचे रुग्णालय तातडीने मंजूर करून घेतले होते. जेऊर येथे सरकार मान्य कोविंड सेंटर तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. जेऊर येथे कोविड सेंटर संदर्भात सोलापूर सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार पाटील यांनी फोन वरून मागणी केली होती. डॉ. ढेले यांनी लाईट आणि स्वच्छतेची अडचण सांगताच पाटील यांनी दोन दिवसात सगळी व्यवस्था करतो असा शब्द दिला होता. सदर यंत्रणेला आदेश देऊन पूर्ण केले. फक्त राजकारण करण्यासाठी आणि स्वत:चे अपयश लपविण्यासाठी व श्रेय लाटण्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी घाईगडबडीत हॉस्पिटलचे उदघाटन केले.
कोरोना तालुक्यामध्ये वाढत असताना तालुक्याचे प्रतिनिधी मात्र पंढरपूर निवडणुकीमध्ये मश्गुल होते.
जेऊर येथील कोविंड सेंटर हे ३० बेडचे असून याचा लाभ जेऊर परिसरातील विशेषता शेलगाव, वांगी, चिखलठाण, कुगाव, दहिगाव, लव्हे, शेटफळ, कंदर, बिटरगाव, पांगरे आदी भागातील रुग्णांना होणार आहे. कोविंड सेंटरची साफसफाई करण्यात आली असून तात्काळ सदरचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली.


ग्रामीण रुग्णालयाची स्वछता करण्यासाठी करमाळा पंचायत समितीचे सदस्य अतुल पाटील, जेऊरचे सरपंच भारत साळवे, अंगद गोडसे, भास्कर कांडेकर, विनोद गरड, धनंजय शिरस्कर, राजशेठ गादिया, शांताराम सुतार, बापू घाडगे, संतोष वाघमोडे, सुलेमान मुल्ला, राजेंद्र जगताप, मुबारक शेख, धनंजय घोरपडे, रामभाऊ जगताप, ग्रामसेवक यशवंत कुदळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *