विलासराव घुमरे यांच्या हस्ते ‘मकाई’च्या बॉयलरचे पूजन

Pooja of boiler of Makai karkhana by Vilasrao Ghumre

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व संचालक बाळासाहेब पांढरे यांनी सपत्नीक बॉयलर पूजन केले. या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा बॉयलर पूजन लवकर झाल्याने हंगामही लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मकाईने गेल्या हंगामात ३.१६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. कठीण काळात हंगाम यशस्वी झाला तसाच हा हंगाम यशस्वी करू, असा विश्वास श्री मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला आहे. अध्यक्ष बागल म्हणाले, यंदा आम्ही विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना व्यवस्थित चालवण्यासाठीचे सर्व नियोजन केले आहे.

बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल म्हणाल्या, मकाई कारखाना ही लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांची आपल्या तालुक्याला दिलेली एक भेट आहे. तालुक्याचा अतिरिक्त उसाचा प्रश्न पाहता तालुक्याच्या पश्चिम भागात मामांनी ‘मकाई’ची उभारणी केली. महादेव गुंजाळ, नंदकुमार भोसले, महादेव सरडे, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, संतोष पाटील, गोकूळ नलवडे, बापू कदम, बाळासाहेब सरडे, रघुनाथ फडतरे, माजी संचालक काशिनाथ काकडे, रणजित शिंदे, विकास रोकडे यावेळी उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र खाटमोडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार संचालक संतोष देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *