जातेगाव- टेंभुर्णी महामार्गासाठी आता भाजपच आक्रमक; स्वातंत्र्यदिनी टाळे ठोको आंदोलन करण्याचा PWD ला इशारा

करमाळा (सोलापूर) : जातेगाव- टेंभुर्णी राज्य महामार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा 15 ऑगस्टला करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान उपअभियंता के. एम. उबाळे यांनी लवकरात लवकर या रस्त्यावरील खडे बजू असे आश्वासन दिले आहे.

भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुकापाध्यक्ष रामभाऊ ढाणे व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी के. एम. उबाळे यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे.
साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक शाळेत समूह राष्ट्रगीत गायन
मोहरमनिमित्त करमाळा शहरात किल्ला विभागातील मानाच्या ‘नालेहैदर’ पंजाची मिरवणूक
तानाजी सावंत यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
दुधाळ जनावरांचा पुरवठा करणाऱ्यांनी अर्ज करावेत
‘गजानन स्पोर्ट क्लब’च्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकारणी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *