खासदार निंबाळकर यांच्या आढावा बैठकीसाठी प्रशासनाकडून तयारी

करमाळा (सोलापूर) : भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज गुरुवारी (ता. १) करमाळा दौऱ्यावर आहेत. केम येथून त्यांनी दौरा सुरु कला असून पंचायत समिती येथे अधिकार्यांची आढावा बैठक घेणार आहेत. त्याची तयारी प्रशासनाने केली आहे. येथील बैठकीनंतर ते करमाळा शहरात काही ठिकाणी नियोजीत भेटी देणार आहेत.

खासदार निंबाळकर हे दोन दिवसाच्या दौर्यावर आहेत. करमाळा शहरासह पांडे, शेलगाव वांगी, चिखलठाण, कोर्टी, वीट येथे भेटी देऊन ते आढावा घेणार आहेत. केम येथून ते करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास भेट देणार आहेत. त्यानंतर 3 वाजता ते करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते किल्ला विभाग, गुजरगल्ली येथे भेटी देणार आहेत.

शुक्रवार सकाळी 9 वाजता पांडे येथे जाणार आहेत. वीट, कोर्टी, चिखलठाण व शेलगाव वांगी येथे भेटी देऊन आढावा घेणार आहेत. करमाळा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या जिल्हा परिषद गटानुसार व सोयीनुसार वरील दौऱ्यात सहभागी व्हावे. याबरोबर आपल्या भागातील कामासंदर्भात सूचना व निवेदने द्यावीत, असे आवाहन भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *