पोलिस संरक्षणात सरडे यांना संगोबा येथील विद्यालयात मुख्याध्यापक पदावर हजर करा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सांगोबा येथील श्री संगमेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाचा पदभार भरत सरडे यांना देण्यात यावा, असे पत्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी दिले आहे. करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांना हे पत्र दिले आहे. सरडे यांना पोलिस संरक्षणात हजर करून पंचनामा करून गोपनीय अहवाल सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

शिक्षणाधिकारी बाबर यांनी ६ तारखेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सरडे यांना श्री संगमेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून पूर्ववत हजर करून घेऊन विद्यालयातील कर्मचारी यांचे वेतन देयक सरडे यांच्या स्वाक्षरीनेच सादर करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेनुसार मुख्याध्यापक म्हणून सहशिक्षक सुनील शिंदे यांना दिलेले सहीचे अधिकार रद्द करावेत, असे या पत्रात म्हटले आहे.

सरडे यांना मुख्याध्यापक पदावरील हक्क व कामकाजापासून वंचित ठेवता येणार नाही. संस्थेत वाद असल्याने पदाधिकारी, अधिकारी न्यायप्रविष्ट असल्याने संस्था अधिनियम १९७७ मधील नियम क्र. ४(६) नुसार संस्था मुख्याध्यापक पदावर हजर होण्यास संबंधित कर्मचारी सरडे यांना प्रतिबंध करू शकत नाही, असा उल्लेखही पत्रात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *