करमाळा पंचायत समितीचे १२ गणातील संभाव्य उमेदवार

Probable candidates from 12 constituencies of Karmala Panchayat Samiti

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६ गटासह करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. २ ऑगस्टपर्यंत यावर हरकती घेता येणार आहेत. आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या कार्यकर्त्यांच्या उमदेवारीची चर्चा सुरु झाली आहे.

यामध्ये जनशक्ती, प्रहार, बळीराजा शेतकरी संघटना यांच्याही निवडणूक लढविण्याच्या घोषणा सुरु झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर लावंड यांच्या काय भूमिका असणार हेही पहावे लागणार आहे. मात्र सध्या स्थानिक पातळीवर उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

स्थानिक पातळीवर कोणते गट कसे एकत्र येणार यावरही अंदाज लावले जात आहेत. मात्र गट व पक्ष एकत्र येताना बंडखोरीही होऊ शकते. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांचे कसे समाधान केले जाणार हे पहावे लागणार आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीही त्या भागात परिणाम करू शकणार आहे. यावरूनच काही कार्यकर्त्यांशी सवांद साधून ‘टीम काय सांगता’ने संभाव्य उमेदवारांची नावे काढली आहेत. यामध्ये अनेक इच्छुकांची नावे वाढू शकतात. ही नावे फक्त चर्चेतून आलेली आहेत. याशिवाय कोण इच्छुक असतील तर त्यांनीही ‘काय सांगता’शी संपर्क साधावा. पेजच्या सर्वात शेवटी आमच्या कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक दिलेला आहे.

१२ गण, आरक्षण, संभाव्य उमेदवार व गणातील गावे
रावगाव : सर्वसाधारण : बागल गटाकडून दिनेश भांडवलकर, देविदास बरडे, संदीप शेळके. जगताप गटाकडून दादासाहबे जाधव, शिंदे गटाकडून सुजित बागल. पाटील गटाकडून येथे कोणाला उमेदवारी दिले जाते हे पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हेही येथे रिंगणात उतरू शकतात. मात्र त्यांचा कोणता राजकीय गट असेल हे पहावे लागणार आहे.
रावगाव गणातील गावे : रावगाव, लिंबेवाडी, वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे, मांगी, भोसे.

पांडे : सर्वसाधारण महिला : पाटील गटाकडून मोहिते पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे यांच्या पत्नी डॉ. स्वाती घाडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष शशिकांत नरुटे यांच्या पत्नी वनिता नरुटे, घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सरोदे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी सरोदे, गहिनीनाथ दुधे यांच्या पत्नी. बागल गटाकडून शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिशचंद्र झिंजाडे यांच्या पत्नी जया झिंजाडे, माजी सभापती भाग्यश्री शिंदे- खटके, विकास भोसले यांच्या आई, बाळासाहेब अनारसे यांच्या पत्नी. शिंदे गटाकडून देविदास वाघ यांच्या पत्नी, रामभाऊ नलवडे यांच्या पत्नी, शीतल क्षीरसागर. शैलजा मेहेर येथे जगताप व सावंत गटाच्या कार्यकर्त्यांच्या शिफारशी महत्वाच्या ठरू शकतात. पांडे गणातील गावे : पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, पोथरे, निलज, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचामाळ, तरटगाव, बिटरगाव श्री दिलमेश्वर व वडाचीवाडी.

हिसरे : सर्वसाधारण : शिवसेनेकडून शाहूदादा फरतडे, उत्तम हनपुडे. शिंदे गटाकडून भारत अवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा नीळ यांचे पती नानासाहेब नीळ, सुभाष हनपुडे, बाळासाहेब जगदाळे, पप्पू सरडे. बागल गटाकडून ज्योतीराम लावंड, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सतीश नीळ, अर्जुन भोगे. पाटील गटाकडून संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू नीळ, संभाजी पाटील, बाळासाहेब पवार, संतोष लावंड, आबासाहेब आंबारे. भाजपकडून काकासाहेब सरडे. हिसरे गणातील गावे : करंजे, भालेवाडी, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, फिसरे, शेलगाव क, सौंदे.

वीट : ओबीसी महिला : पाटील गटाकडून सुभाष जाधव यांच्या पत्नी मंगल जाधव. शिंदे गटाकडून आशिष गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष नारायण खंडागळे यांच्या पत्नी सिंधू खंडागळे. जगताप व बागल गटाकडून येथे कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पहावे लागणार आहे. वीट गणातील गावे : वीट, विहाळ, मोरवड, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, वंजारवाडी, हिवरवाडी, रोशेवाडी, पिंपळवाडी, करमाळा ग्रामीण.

कोर्टी : सर्वसाधारण महिला : बागल गटाकडून आशिष गायकवाड यांच्या पत्नी, काशिनाथ काकडे यांच्या पत्नी. आमदार संजयमामा शिंदे निलेश कुटे यांच्या पत्नी. याशिवाय येथील पाटील, जगताप, शिंदे व बागल गटाचे स्थानिक नेते कोणाची शिफारस करू शकतात. त्याला उमेदवारी मिळू शकते. कोर्टी गणातील गावे : कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, कुस्करवाडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजूरी, दिवेगव्हाण, भिलारवाडी, कावळवाडी, पोंधवडी.

केत्तूर : सर्वसाधारण : शिंदे गटाकडून ऍड. अजित विघ्ने, डॉ. गोरख गुळवे, सुहास गलांडे, गौरव झंजुर्णे. पाटील गटाकडून बापूसाहेब पाटील, मोहिते पाटील समर्थक संग्रामराजे राजे भोसले. बागल गटाकडून नितीन पांढरे, अजित झंजुर्णे, देविदास साळुंखे. माजी आमदार रावसाहेब पाटील यांचे चिरंजीव उदयसिह मोरे पाटील हे अपक्ष रिंगणात उतरू शकतात. केत्तूर गण : केतूर, पारेवाडी, गोयेगाव, पोमलवाडी, खातगाव, टाकळी रा., कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमरवाडी, हिंगणी.

चिखलठाण : सर्वसाधारण महिला : शिंदे गटाकडून चंद्रकांत सरडे यांच्या पत्नी किंवा आई. राजेंद्र बारकुंड यांच्या शिफारशीचाही येथे उमेदवारीसाठी विचार केला जाऊ शकतो. बागल गटाकडून विजय गोडगे यांच्या पत्नी किंवा आई, दादासाहेब डोंगरे यांच्या पत्नी रेश्मा डोंगरे, रेवनाथ निकत यांच्या पत्नी, संतोष पाटील यांच्या पत्नी, गणेश झोळ यांच्या पत्नी, विकास गलांडे यांच्या पत्नी व अक्षय सरडे यांच्या आई. पाटील गटाकडून बिबिषण पवार यांच्या पत्नी, नवनाथ झोळ यांच्या पत्नी, दत्तात्रय सरडे यांच्या पत्नी. जगताप गटाकडून महादेव कामटे यांच्या पत्नी. येथे माया झोळ या देखील उमेदवार असू शकतात. चिखलठाण गणातील गावे : वाशिंबे, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, चिखलठाण, कुगाव, केडगाव, सोगाव.

उमरड : एससी महिला : पाटील गटाकडून राजाभाऊ कदम, दादासाहेब चौघुले, दत्तात्रय गव्हाणे. बागल गटाकडून गणेश चौधरी, मारुती पवार, सुभाष इंगोले. शिंदे गटाकडून वामनराव बदे, प्रशांत पाटील, राजेंद्र पवार यांच्या शिफारशी महत्वाच्या ठरू शकतात. उमरड गणातील गावे : झरे, कुंभेज, वरकटणे, सरफडोह, कोंढेज, उमरड, पोफळज, अंजनडोह.

जेऊर : ओबीसी सर्वसाधारण : पाटील गटाकडून माजी सभापती अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह स्थानिक पातळीवर शिंदे, पाटील व बागल गटाकडून कार्यकर्त्यांच्या शिफारशीही महत्वाच्या ठरणार आहेत. त्यातून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे पहावे लागणार आहे. जेऊर गणातील गावे : जेऊर, जेऊरवाडी, निभोरे, लव्हे, शेलगाव वा, शेटफळ, दहिगाव.

वांगी : एससी सर्वसाधारण : या भागातील सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे तेथे आताच काही सांगता येणार आहे. वांगी गणातील गावे : वांगी (1, 2, 3, 4), भीवरवाडी, बिटरगाव वा, सांगवी, ढोकरी, पांगरे, भाळवणी, कविटगाव.

साडे : सर्वसाधारण : शिंदे गटाकडून दत्ता जाधव, विलासराव राऊत. पाटील गटाकडून दादा भांडवलकर, सचिन पाटील. बागल गटाकडून नवनाथ बदर.
केम : ओबीसी महिला : शिंदे गटाकडून गोरख पारके, डॉ. कुरडे. बागल गटाकडून अच्युत तळेकर, महेश तळेकर, महावीर तळेकर. पाटील गटाकडून शेखर गाडे, अजित तळेकर, अनिरुद्ध कांबळे. जगताप गटाकडून सागर दोंड, आनंद शिंदे. यासह प्रमुख गटांच्या कार्यकर्त्यांच्या शिफारशी महत्वाच्या ठरू शकतात. कारण येथे महिला ओबीसी आरक्षण आहे.
साडे व केम गणातील गावे : साडे, नेर्ले, आवाटी, सालसे, घोटी, आळसुंदे, वरकुटे, पाथुर्डी, केम, सातोली, वडशिवणे, मलवडी, कंदर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *