करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. नितीन तळपाडे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे सिनेट सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. प्रा. तळपाडे हे महाराष्ट्रातील आदिवासी या समाज घटकाचे अभ्यासक, विचारवंत वक्ते आहेत. मराठी विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून ही निवड झाली आहे.
सुटा संघटनेचे नेते प्रा. डॉ. नेताजी कोकाटे, प्रा. डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. बाळासाहेब दास, प्रा. डॉ. अनिल साळुंखे, प्रा. अभिमन्यू माने, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. कृष्णा कांबळे, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम याच्या पुढाकारातून ही निवड झाली आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड व उपप्राचार्य कॅप्टन प्रा. संभाजी किर्दाक यांनी प्रा. तळपाडे यांचे अभिनंदन केले आहे.


